Manoj Jarange Live l मराठ्यांचं वादळ शमणार? सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

Manoj Jarange Live l सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलंच चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना झाले आहेत. अशातच आता मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण मोर्चेकरी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. (Manoj Jarange Mumbai March Live Update)

Manoj Jarange Live l मराठा वादळ मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु! :

अशातच आता सरकारकडून जरांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मुंबई कृषीउत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलनकांनी तिथेच थांबावे यासाठी सरकारकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अशातच सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराव आर्दड मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Manoj Jarange Live l मनोज जरांगे यांचा दावा :

मनोज जरंगे यांनी बुधवारी दावा केला की, महाराष्ट्रात आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्या आहेत ज्यात मराठा समाजाचे सदस्य कुणबी समाजाचे असल्याचे समोर आले आहे. त्यांना जात प्रमाणपत्र तातडीने देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 20 जानेवारी रोजी जरंगे यांनी हजारो (Maratha Aarkshan) समर्थकांसह जालना जिल्ह्यातून मुंबईपर्यंत पदयात्रा काढली.

राज्य सरकारने मराठ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटांतर्गत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.अनेक वाहनांसह हा मोर्चा बुधवारी पुणे शहरातून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. उद्या म्हणजेच 26 जानेवारीला मुंबईतच त्याची सांगता होणार आहे. (Manoj Jarange)

अशातच आता लाखोंच्या संख्येने मराठा वादळ मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या पोहचणार आहे. मात्र त्याआधी हे वादळ शमणार का मागण्या पूर्ण करणार याकडे सर्वचं लक्ष असणार आहे.

News Title : Manoj Jarange Mumbai March Live Update

महत्वाच्या बातम्या :

Board Exam Tips l या मार्गांनी बोर्ड परीक्षेचा ताण कमी करा आणि चांगले मार्क्स मिळवा

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! आज या राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळावा

Benefits of drinking water l शरीरात पाण्याची कमतरता आहे की नाही? तुम्ही अशाप्रकारे तपासू शकता

Bigg Boss 17 l बिग बॉस 17 ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट! कधीआणि कुठे पाहता येईल फिनाले

Jobs are not at risk from AI l दिलासादायक बातमी! तुमची नोकरी AI पासून धोक्यात नाही; संशोधनात समोर