अजय महाराज बारस्कर पुन्हा एकदा आक्रमक, जरांगे पाटलांवर नवे आरोप केल्याने खळबळ

Manoj Jarange Patil | राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. राज्यातील अनेक भागात 10 तासांसाठी नेट बंद केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून जरांगेवर त्यांचे जिवलग अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोेप केले होते. त्यांनी केलेले सर्व आरोप जरांगेंनी फेटाळून लावले. दरम्यान, काल आक्रमक झालेले जरांगे मुंबईकडे रवाना होणार असल्याचं स्वतः म्हटलं होतं. मात्र, जरांगेंनी यू टर्न घेतला. याच पार्श्वभूमीवर अजय बारस्कर यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले बारस्कर?

बारस्कर यांनी आज (26 फेब्रवारी) रोजी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलत असताना ते म्हणाले की, काल जो काही प्रकार घडला त्यावरुन मला असं वाटत आहे की, जरांगे हे अपरिपक्व नेते आहेत. मराठा आंदोलानामुळे जो काही मान सन्मान त्यांना मिळाला आहे, तो नाहीसा झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या हेकेखोरपणामुळे हे झाले आहे.”

त्यांनी आपल्यावर केलेल्या एकाही आरोपाचा त्यांच्याकडे पुरावा नाहीये. मी केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केलेले नाही. का घाबरत आहेत ते मला? जरांगे मला म्हणाले की, मी फडणवीस यांचा हस्तक आहे. मी त्यांच्याकडून 40 लाख घेतले असं जरांगे म्हटले. 300 कोटीची संपत्ती असल्याचं देखील जरांगे (Manoj Jarange Patil)  म्हणाले. मात्र, त्यांनी काहीही पुरावे दिलेले नाहीत असे बारसकर यांनी म्हटले.

जरांगेंमुळे समाजाची छी थू-

बारस्कर बोलत असताना म्हणाले की, कालपर्यंत जरांगेंच्या (Manoj Jarange Patil)  विरोधात कोणी बोलत नव्हतं. मात्र, आज सर्वजण त्यांच्या विरोधात बोलत आहेत. आपल्याकडून आडदांडपणा झाल्याची कबूली त्यांनी स्वत:च दिली आहे. दीड कोटीच्या समाजाचे नेतृत्व करणारे आज दोनशेवर आले. जरांगेंमुळे अख्ख्या समाजाची छी थू होत आहे.  काल अर्ध्या रस्त्यातून माघार घेण्याची आपला निर्णय बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याची टीका देखील बारसकर यांनी केली.

राज्यात इंटरनेट बंद-

अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

News Title : manoj jarange patil criticized by ajay baraskar

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटलांना मोठा झटका!; पोलिसांनी केली ही मोठी कारवाई

भारतीय युवाशक्तीचा विजय! टीम इंडियाने चौथ्या कसोटीत इंग्लंडला लोळवलं, मालिकाही जिंकली!

मार्च महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस शेअर मार्केट राहणार बंद! पाहा यादी

सिनेरसिकांनो ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता