आधी डिस्चार्ज पुन्हा सलाईन…; जरांगेंच्या प्रकृतीबदल डाॅक्टरांकडून मोठी माहिती

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाल्यानंतर सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. (01 मार्च) ला रात्री अचानक जरांगेंच्या छातीत कळ मारल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले. आंदोलन आणि आमरण उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

काय घडलं नेमकं?

जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत होते. सरकार जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत उपोषण करत राहणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. दरम्यान, मराठा बांधवांनी विनंती केल्यानंतर जरांगेंनी आपलं उपोषण थांबवलं. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेण्यास सुरुवात केली मात्र, तब्येतीमध्ये सुधारणा दिसल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना अंतरवाली सराटी येथे घेऊन जाण्यात आलं. डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीला पोहचले होते. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. मात्र रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्रास अधिक वाढल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संभाजीनगरच्या डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली.

डाॅक्टरांनी काय सांगितलं?

उपचारा दरम्यान डाॅक्टर म्हणाले की, अनेक दिवसांपासून उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे. जरांगेंनी (Manoj Jarange Patil) काही दिवस आराम करावा. जरांगेंचा रात्री उशीरा इसीजी काढला मात्र, सुदैवाने यामध्ये कोणताच धोका नाहीये. अशक्तपणामुळे त्यांच्या छातीत कळा मारल्याचं डाॅक्टरांनी स्पष्ट केलं.

जरांगेंना रात्रीच अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डाॅक्टरांना बोलवण्यात आलं असता जरांगेंचा इसीजी काढला. अॅसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अशक्तपणामुळे तब्येत खालावली-

ईसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

News Title : manoj jarange patil dr. gives health update

महत्त्वाच्या बातम्या-

जरांगेंचा इसीजी काढल्यानंतर डाॅक्टरांकडून मोठा खुलासा!

जरांगेंना नेमकं झालंय तरी काय?; प्रकृतीबाबत डाॅक्टरांनी स्पष्टच सांगितलं

अचानक छातीत कळा, तब्येत बिघडली…; मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी

भाजपला मोठा धक्का;…म्हणून गौतम गंभीर निवडणूक लढवणार नाही

तुमच्या वाहनालाही VIP क्रमांक हवायं? तर या 7 स्टेप्स करा अन् VIP क्रमांक मिळवा