Manoj Jarange Patil Live l जाणून घेऊयात सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?

Manoj Jarange Patil Live l गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं राजकारण मराठा आरक्षणावरून चांगलंच तापलं होतं. मात्र अशातच आज मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते (Manoj Jarange Patil Live) याबाबतचा अध्यादेश जरांगे यांच्याकडे सोपवल आहे. मात्र राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये ‘सगेसोयरे’या शब्दावरुन चर्चा सुरू होती आणि आज मात्र सगेसोयऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. मात्र ‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण आहेत हे जाणून घेऊयात… (Maratha Reservation Latest News)

‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण?

सरकारने आज जारी केलेल्या जीआनुसार सगेसोयरे शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे हे सांगण्यात आले आहे. दिलेल्या जीआरनुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil Live l रात्रीपासून ते पहाटेपर्यंत घडमोडी नेमक्या कशा घडल्या? :

– रात्री 11:30 च्या सुमारास राज्य सरकारच शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते.

– यानंतर मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळासोबत जवळपास तीन तास चर्चा झाली आहे.

– शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.

– या सर्व घडामोडीनंतर सोयरे शब्द अध्यादेशात समाविष्ट करण्यात आला.

– यानंतर रात्री 3:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री दिपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न झाली.

– अशाप्रकारे आज (शनिवार) सकाळी वाशी येथे शिवाजी चौकात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उपोषण सोडलं आणि अखेर सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत.

News Title : Manoj Jarange Patil Live

महत्त्वाच्या बातम्या-

Maratha Reservation l मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

Sania Mirza Instagram Post l सानिया मिर्झाची इंस्टग्राम पोस्ट होतेय ट्रोल! पाहा नक्की काय आहे

Fighter Online Leaked l या वेबसाईटवर फायटर चित्रपट ऑनलाईन लीक! निर्मात्यांना मोठा धक्का

Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील