‘फेस काॅलवर काय काय बोलले…’; जरांगेंनी केला मोठा खुलासा!

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा बांधवाना हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत होते. त्यानंतर जरांगे पाटलांनी जालना येथे अंतरवाली सराटी या गावात त्यांनी उपोषण केलं होतं. मात्र, मराठा बांधवानी विनंती केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. दरम्यान आज आधिवेशन सुरु असताना जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) वक्तव्यावरुन चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

पुढे काय घडलं?

जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांवर वारंवार होत असलेल्या आरोपानंतर त्यांच्यावर SIT मार्फत चौकशी करण्यासाठी आदेश दिला आहे. मात्र त्यावर जरांगेंनी काही खुलासे केले आहेत. माध्यमांशी बोलत असताना जरांगे म्हणाले की, “मी मराठ्यांचं काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणारे आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जरांगेंवर (Manoj Jarange Patil) प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टीकवलं. जरांगेंवर मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजासाठी मी काय केलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली. कर्ज दिलं आहे. मराठा सामाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले आणि त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. मराठा समज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहिले नसल्याचे फडणवीस म्हणाले.

मंडप हटवणार?

अंतरवालीला रवाना होत असताना जरांगेंनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पोलिस म्हणाले की, सध्या तरी मंडप हटवणार नाही. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

News Title : manoj jarange patil reactions on dcm devendra fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगेंना मोठा झटका; रुग्णालयातून सलाईन काढून जरांगे तातडीने अंतरवालीकडे रवाना, नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील ‘या’ पक्षाचे उमेदवार असणार; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मनोज जरांगेंना मोठा धक्का!; मराठा कुणबी नोंदणीबाबत जरांगेंचा ‘तो’ दावा खोटा

…तर विराट कोहली IPL खेळणार नाही; चाहते नाराज

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद