“…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, मनोज जरांगेंनी केलं मोठं विधान!

Manoj Jarange Patil |  मराठा आरक्षणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय अधिवेेेशन ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र मनोज जरांगेंना ते मान्य नसल्यामुळे जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाला जरांगेंनी मान्यता दिली असून त्यांनी एक अट देखील घातली आहे. या मुद्यावर अनेक राजकीय नेत्यांनी उडी मारली होती. यामध्ये गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. गिरीश महाजन यांच्यावर बोलत असताना जरांगेंनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले जरांगे?

माध्यमांशी बोलत असताना गिरीश महाजन म्हणाले की, “मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांचे लाड केले होते, मात्र आता त्यांना माफी नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.” दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर बोलत असताना जरांगेंनी पलटवार केला. जरांगे म्हणाले की, “मोदीसाहेब आले गेले, मला चॅलेंज देऊ नका, जनता आम्हाला कळते, तुम्ही आमचे काय लाड केले?, मला बोलायला लावू नका, मी समाजाला एक सांगतो की मी सामाजासाठी लढत आहे, समाजच माझा मालक आहे. त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही.”

जरांगेंची राजकारणात एन्ट्री?

काही दिवसांपासून जरांगे राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान जरांगेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी जरांगे यांना जालन्याची सीट देण्याबाबत चर्चा केली आहे.

राजकारणात येण्याबाबत जरांगेंची प्रतिक्रिया-

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेचं तिकिट देण्याबाबत मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे, असं जरांगे म्हणालेत.

News Title : manoj jarange patil speaks about maratha protest

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे, अखेर….

या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

गुड न्यूज! दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात होणार डिलिव्हरी

BCCI ने जाहीर केला वार्षिक करार! या चार खेळाडूंना मिळणार तब्बल 7 कोटी रुपये

आजचे राशिभविष्य! गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल