मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सगळीकडे एकच चर्चा

Manoj Jarange Patil | मराठा आंदोेलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपली कंबर कसली आहे. गेल्या अनेेेक महिन्यांपासून जरांगे उपोषण करत आंदोलन करत आहेत. तर काही दिवसांपासून मराठा बांधवांनी जरांगेंना आग्रह केल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान सगळीकडे चर्चा आहे ते त्यांच्या संघर्षाची. जरांगे यांच्या जिवनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘संघर्ष योद्धाचा’ टीझर आऊट –

मनोज जरांगेंंनी (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा व आतापर्यंत केलेले आरक्षणासाठी केलेला संघर्ष यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संघर्ष योद्धा असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन याबाबत या चित्रपटात असल्याचं टीझरवरून स्पष्ट होत आहे.

संघर्ष योद्धा या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती हे सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत , शिवाजी दोलताडे यानी दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. डॉ.सुधीर निकम यांची संवाद आणि पटकथा आहे.

आरक्षणासाठी जरांगेंची लढाई-

गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे पाटील आंदोलन, राज्यभर दौरे आणि सभा यामुळे त्यांना लाखो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जरांगे प्रसिद्धिच्या झोतात आले. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना कोणीही ओळखत नव्हतं. तो सामान्यातला सामान्य व्यक्ती होता. पण आज तो शरद पवारांचा बाप झालाय, अशा प्रकारचे वक्तव्य देखील केली जात आहेत. फार कमी काळात मनोज जरांगेंना मराठा बांधवांनी पाठिंबा देला.

“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील”-

जरांगेंनी केलेली उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाच्या टीजरमधून दिसत आहे.

News Title : manoj jarange patil video viral

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीला अशाप्रकारे भोलेनाथाची पूजा करा; होईल मनातील इच्छा पूर्ण

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

‘पहला नशा’…आमिर खान आणि नीता अंबानीचा तो डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

सैनिकांसाठी आनंदाची बातमी! Honda Elevate कार आर्मी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असणार

रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम तोडण्यास सज्ज; नशीब साथ देईल का?