‘गावातील महिलेंनी त्याच्यावर बलात्काराचे..’; जरांगेंचा बारस्करांबाबत मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दिवस रात्र आंदोलन करत आहे. मात्र, हे सुरु असताना त्यांच्या जवळचे आणि विश्वासू असलेले जिवलग मित्र अजय महाराज बारस्कर यांनी काल माध्यमांशी बोलत असताना जरांगेंवर गंभीर आरोप केले. बोलत असताना बारस्कर म्हणाले की, मनोज जरांगे (Manoj Jarange) हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे. त्याच्या मिटिंग या नेहमी रात्री होतात. वाशीला (Vashi Maratha Morcha) आंदोलन पोहोचलं, त्या रात्री गुप्त मिटिंग घेतल्या गेल्या, असा धक्कादायक आरोप बारस्कर यांनी केला होता.

जरांगेंचा बारस्करांवर पलटवार-

दरम्यान, आज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पत्रकार परिषेद घेत बारस्करांवर पलटवार केला. बारस्करांनी केलेले सर्व आरोप जरांगेंनी फेटाळले. बारस्करांवर बोलत असताना जरांगे म्हणाले की, अजय बारस्कर हा कोणी महाराज वैगरे नाहीये. एक कोणतं तरी संस्थान आहे आणि त्याच्या नवाखाली बारस्करने 300 कोटी रुपये लोकांकडून जमा केले आहेत.बारस्करचं मूळ गाव वेगळं आहे. तो भिशी घेऊन पळून गेला आहे.

महिलांनी बलात्काराचे आरोप केले-

जरांगे (Manoj Jarange) पुढे म्हणाले की, गावातील लोक बारस्कर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात. अशाच एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारस्कर अडकला होता. ते प्रकरण सरकारकडून दाबले गेले. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी अजय बारस्कर देण्यात आली असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

जरांगेंवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांचं नाव घेऊन मरतो म्हणायचं पण तू तुकाराम महाराजांसाठी नाही मरायला लागला. तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहेस. तू इतके कुटाणे केलेत की तू मरणारच आहेस. असं मरण्यापेक्षा याला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन सहानुभूती घेऊन मरायचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

आंदोलनाच्या प्लॅनबदल माहिती –

29 फेब्रवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे म्हणाले. तसेच 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 3 तारखेला असा रास्ता रोको झाला पाहिजे की, भारतात असा रास्ता रोको कधीच झाला नसेल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

News Title : manoj jarange reveals truth about baraskar

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो नेता सांगतो तसंच…’; संगिता वानखेडेंचा जरांगेंवर अत्यंत धक्कादायक आरोप!

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! उद्या अवघ्या 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट

‘या’ तारखेला सर्वात मोठा रस्ता रोको करणार; जरांगेंनी घोषणा करत दिली सर्वात महत्त्वाची माहिती

मोहम्मद शमीला मोठी दुखापत; थेट लंडनमध्ये होणार ऑपरेशन

मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप