Manoj Jarange | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सरकारसोबत याबाबत वारंवार बैठका घेत आहेत. तसेच काही महिन्यापूर्वी राज्यात जाऊन सभा देखील घेतल्या आहेत. मराठा बांधवांनी जरांगेंच्या सभेला पाठिंबा देखील दिला. दरम्यान सरकारने आरक्षणासंदर्भात एक दिवसीय अधिवेशन घेतलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आलं. हे प्रकरण सुरु असताना जरांगे पाटलांवर त्यांच्या जिवलग मित्राने काही गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे जरांगेंची (Manoj Jarange) सहकारी संगिता वानखेडेंनी देखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
काय म्हणाल्या संगिता वानखेडे?
माध्यमांशी बोलत असताना संगिता वानखेडे म्हणाल्या की, जरांगेंना एका नेत्याचा फोन येत होता. तो नेता दुसरा तिसरा कोणी नसून शरद पवार आहेत. शरद पवार मनोज जरांगेंना (Manoj Jarange) फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुढे त्या म्हणाल्या की, पुण्यात जरांगेंचे जे काही बॅनर लावले ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत.
बोलत असताना वानखेडे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील टोपी घालून अख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
मी भुजबळांना ट्रोल केलं होतं-
दरम्यान, या वेळेस वानखेडे म्हणाल्या की, ”मनोज जरांगे (Manoj Jarange) भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंतू, मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केलं होतं. मात्र, मला खरं समजल्यावर गेल्या 1 ते 1/5 महिन्यांपासून मी विरोध करत आहेत.”
मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते-
पुढे त्या म्हणाल्या की, “मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवलं आहे.”
News Title : manoj jarange sangita wankhede tells the truth
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेला सर्वात मोठा रस्ता रोको करणार; जरांगेंनी घोषणा करत दिली सर्वात महत्त्वाची माहिती
मोहम्मद शमीला मोठी दुखापत; थेट लंडनमध्ये होणार ऑपरेशन
मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप
‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!
WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा