ब्रेकिंग न्यूज! या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार

Manoj Jarange SIT inquiry l महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 17 दिवसांनी आपले उपोषण काल मागे घेतले आहे. गावातील महिलांच्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली आहे. दरम्यान, पहिल्यांदाच मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेत आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. आंदोलनासाठी पैसा कुठून येतो, आंदोलनामागे कोण आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. (Maratha Reservation)

Manoj Jarange SIT inquiry l जरांगे पाटलांची SIT चौकशी होणार :

जरांगे पाटील आता नेत्यांची भाषा करत आहेत. याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ देखील झाला आणि त्यानंतर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

यादरम्यान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहेत. त्याचवेळी जरांगे यांना घरात भेटणारे लोक कोण होते आणि ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार बोलत होते, याचा तपास होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (Maratha Reservation)

यापूर्वी बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. धारूर आणि अमळनेर पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बीडमध्ये जमावाला भडकावून रास्ता रोको, महामार्ग रोखून उपद्रव निर्माण केल्याचा आरोप जरांगेवर आहे. त्याचवेळी मनोज जरांगे यांनी थेट गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून, त्यानंतर सरकार आणि मनोज यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे.

Manoj Jarange SIT inquiry l मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय आरोप केले? :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यांनी अंतरवाली-सराटी प्रकाराची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, जिथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज झाला असता तर मराठ्यांनी पुन्हा दंगल केली असती, असे जरंगे म्हणाले होते.
अंतरवाली-सराटीमधील पहिल्या लाठीचार्जामागे फडणवीस यांचा हात होता.

आताही त्याची पुनरावृत्ती करण्याचा डाव आहे. मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्यास ते नकार देत आहेत. मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी मराठा समाजाला चिथावणी देऊ नये असे आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत.

News Title : Manoj Jarange SIT inquiry

महत्त्वाच्या बातम्या-

सकाळी रिकाम्या पोटी धावणे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत

कमाईची संधी गमावू नका! आज या 3 कंपन्यांचे IPO उघडणार

उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये! पाहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

आजचे राशिभविष्य! वडिलोपार्जित संपत्ती मिळविण्यातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, पहिल्यांदाच केली मोठी घोषणा