‘या’ भाजप नेत्याने नोटबंदीवरून पंतप्रधानांवर उठवली टीकेची झोड

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी मोदी सरकारनं नोटाबंदी केली नव्हती, तर नोटा बदलून दिल्या, असं वक्तव्य केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी यांनी हा दावा केला आहे. तिवारी यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना आणि भाजपला ट्रोल करण्यास सुरु केलं आहे.

खरं सांगायचं तर ही नोटाबंदी नव्हती, तर नोटाबदल होता. जुन्या नोटा द्या आणि नव्या नोटा घ्या अशी ही साधी योजना होती. ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसा साठवला होता, त्यांना यामुळे अडचण येणार होती, असं तिवारी म्हणाले आहेत.

दरम्यान, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं; उद्धव ठाकरेंचा खुलासा

-महात्मा गांधींना शिव्या घालणारे रावणाची औलाद; काँग्रेसकडून भाजपचा समाचार

-मुनगंटीवारांनी गायलं शिवसेनेसाठी ‘हे’ खास गाणं…!

-भाजपला राजकीय पटलावर आणखी एक धक्का; यवतमाळ विधानपरिषद ही गेली भाजपच्या हातातून

-मोदींनी देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची माफी मागावी- जितेंद्र आव्हाड