दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार – मनोज तिवारी

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला हळूहळू सुरूवात झाली आहे. सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने जोरदार मुसंडी मारली आहे. दिल्लीच्या 70 जागांपैकी आप 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यावर दिल्लीमध्ये काहीही निकाल आले तरी त्या निकालाला भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जबाबदार राहीन, असं मनोज तिवारी म्हणाले आहेत.

दिल्ली विधानसभेचे जे काही कल हाती येत आहेत यामध्ये भाजप आणि आपमध्ये मोठं अंतर आहे. तरीसुद्धा सगळे निकाल स्पष्ट व्हायला आणखी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मला आशा आहे की भाजपला आणखी काही ठिकाणी विजय मिळेल, असं तिवारी म्हणाले.

मतमोजणीचे वेगवेगळे टप्पे असतात. आता निराश होण्यासारखे काही नाही. आम्हाला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळत आहेत. 27 जागांवर 700 ते हजार मतांचा फरक आहे. ही आकडेवारी आणखी बदलू शकते, असंही तिवारी म्हणाले.

दरम्यान, शाहीनबागचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणावरून सध्या भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचं हिंगणघाट पीडितेला पत्र

-अमित शहाजी, राजेंना खासदार करून मंत्री करा; चाहत्याने लिहिलं रक्ताने पत्र

-आपले गडकिल्ले ही छत्रपतींची देण…. हेच वैभव जगाला दिमाखात दाखवणार- उद्धव ठाकरे

-धक्कादायक… मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिल अन् भावाने केली आत्महत्या!

-आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अनुसुचित जाती जमातींवर अन्याय करणारा- आठवले