1 फेब्रुवारीपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली | नवीन वर्ष 2022 चा पहिला महिना आता संपणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे फेब्रुवारीपासून अनेक बदल होणार आहेत.

येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचं बजेट मांडतील. 2022-23 चं बजेट निर्मला सीतारमण मांडणार आहेत.

बजेट व्यतिरिक्त 1 फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे.

SBI मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करत आहे. आता IMPS द्वारे 2 लाख ते  5 लाखांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक 20 रूपयांपैक्षा अधिक जीएसटी शुल्क आकारेल. याचाच अर्थ आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करणं महागात पडणार आहे.

फेब्रुवारीपासून होणाऱ्या बदलांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या चेक क्लिअरन्स नियमाचाही समावेश आहे. आता तुम्हाला चेकशी संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच तुमचा चेक क्लिअर होईल.

पंजाब नॅशनल बॅकमध्ये आता तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक न केल्यास 250 रुपये दंड भरावा लागणार आहे.

घरगुती गॅसच्या किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. त्यामुळे आता गॅसच्या किंमती कमी होणार की वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आगामी बजेटमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा थेट फरक तुमच्या आमच्या खिश्यावर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आई प्रचारसभेत सांगायची, मुंडेसाहेबांचं चिन्ह कमळ अन् ही आमची पंकजा”

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत रडली शेहनाज, सलमान खानलाही अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

 सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं

12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार

“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”