‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

मुंबई | बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा मुद्दा चर्चेत आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना त्याचा सामना करावा लागला आहे. नुकतेच अभिनेत्री ईशा कोप्पीकर म्हणाली की नेपोटीजम, पक्षपात आणि समूहवाद सारख्या प्रथा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अन्य ठिकाणीही आहे.

अभिनेता हृतिक रोशन यांनी अभिनय केलेला ‘सुपर ३०’ या चित्रपटात ‘आता राजाचा मुलगा, राजा नाही होणार. आता राजा तोच होणार, जो यासाठी पात्र आहे’ हा संवाद आहे. या संवादावर प्रकाश टाकत अभिनेत्री ईशा कोप्पीकर म्हणाली की, हा संवाद फक्त चित्रपटाच चांगला वाटतो. वास्तविक जीवनात हे पूर्णपणे वेगळं चित्र आहे.

बॉलिवूडमधील नेपोटीजमविषयी ईशा कोप्पीकर म्हणाली, अखेर कठोर मेहनतच महत्वाची आहे, ज्याला महत्व आहे. तुम्ही नेपोटीजम म्हणा किंवा पक्षपात, मला असं वाटतंय की इथे आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांना जागा नाहीये. पण बरेचसे स्टारकिड्स आले आणि त्यांना जास्त काही करता आलं नाही.

पुढे बोलताना म्हणाली, स्टारकिड्स यांना संधी मिळाली पण त्यांचे गुण कुठेतरी कमी पडले. त्यातच आमच्यासारख्या बाहेरच्या लोकांची इथे प्रत्येक ठिकाणी परीक्षा असते आणि आम्हाला कठोर मेहनतीशिवाय काहीही पर्याय उरत नाही. माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, प्रियांका चोपडा जोनास, अनुष्का शर्मा हे बाहेरून आले आहे पण त्यांनी त्यांची जागा प्रस्थापित केली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या कॅम्पविषयी बोलताना ईशा कोप्पीकर म्हणाली, मी यात काय बोलू शकते? असं असू शकत की हे लोक त्या लोकांसोबत काम करायला इच्छुक असतील, ज्यांना ते आवडत आहे. मला माहित नाही की आतमध्ये काय चालल आहे. माझीही तक्रार आहे. मीही वाईट होऊ शकते.”

कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ईशा कोप्पीकर म्हणाली, हो हेही होत आहे. पण हे तुम्ही काय करू इच्छिता यावर ते अवलंबून आहे. तुम्हाला कास्टिंग काऊचच्या मदतीने काम करायचे असेल तर करा. बऱ्याच अभिनेत्रींनी केले आहे आणि त्या आता अगदी उच्चस्थानी पोहोचल्या आहे.

यावर त्या पुढे बोलताना म्हणाल्या, पण तुम्हाला कास्टिंग काऊच करायचे नसेल तर करू नका. तुमच्याकडे नेहमी एक पर्याय उपलब्ध असतो. मला रात्रीची चांगली झोप आवडते. सध्या बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या ड्र.ग्ज कनेक्शनबाबत ईशा म्हणाली, यावर बोलण्यासाठी मला कोणताही अधिकार नाही आणि यामुळे कोणाच्याही भावना दुखावू शकतात.

पुढे बोलताना म्हणाल्या, एक व्यक्ती कंपनीमुळे ओळखला जातो, ज्यांनी त्याला ठेवले आहे. मी माझ्याबद्दल सांगू शकते. मी कधीही अशा गोष्टींचा सामना केला नाही आणि मी असे कामही केले नाही. ज्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचेल. पण मला असं वाटतंय की, ड्र.ग्ज मा.फिया ही अशी गोष्ट आहे, ज्यावर नियंत्रण हवेच. यामुळे अनेक तरुण वाया जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रतन टाटांच्या टाटा मोटर्सला भारतीयांची साथ, सप्टेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी विक्रीत वाढ…!

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक सामूहिक ब.लात्कार; भाजप नेत्याला ठोकल्या बेड्या!

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीचं निधन

आयपीएलमध्ये धोनीनं केला ‘हा’ कारनामा; सुरेश रैनाला टाकलं मागे!

कोरोना काळात डिप्रेशनमधून कसे वाचावे ? गायक हरिहरन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स…