‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अनेक देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असं वाटत असताना अनेक देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. पण कोरोना इथेच संपत नाही. जगभरात कोरोनाच्या आणखी लाटा येणार असल्याची भीती वर्तवली जात आहे.

भारतीतील विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी कोरोनाच्या संभाव्य लाटांबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. येत्या काळात जगभरात कोरोनाच्या अनेक लाटा येतील, असं वक्तव्य डॉ. कांग यांनी केलं आहे.

कोरोना महामारीच्या आणखी अनेक लाटा येतील. कारण हा एक श्वासोच्छवासातून पसरणारा विषाणू आहे. कोरोनासारखे असे विषाणू बराच काळ हवामानात कायम राहतात, अशी माहिती डॉ. कांग यांनी दिली आहे.

आपण SARS-COV-2 विषाणूबरोबर जगणं शिकलं पाहीजे, असा सल्ला देखील डॉ. कांग यांनी दिला आहे. अव्वल तज्ज्ञांकडून येणारी ही माहिती जगाची चिंता वाढवणारी आहे.

जगभरातील अनेक देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकुळ घातला आहे. इतर काही देशांप्रमाणे भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत.

कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असताना देशातील टॉप तज्ज्ञांकडून येणारी ही माहिती सर्वांचीची धास्ती वाढवणारी आहे.

ओमिक्रॉनचा प्रभाव कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा काहीसा कमी गंभीर असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, कोरोनाच्या लाटा येत राहणार. कोरोना हा असा विषाणू आहे, जो पुन्हा पुन्हा पसरत राहणार, अशी माहिती देखील डॉ. कांग यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लादायला सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा

गब्बर इज बॅक! रोहित शर्मा संघाबाहेर, ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद, पाहा तारखा