सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन जुगलबंदी सुरु आहे. त्यातच आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत भाष्य केलं आहे.
आपापलं काम करत राहायचं असतं. आपल्याला पद अनपेक्षितपणे मिळत असतात. अध्यक्षपदी विराजमान होईल याची जाणीवही नव्हती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाच वर्षापूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी फोन आला आणि मंत्री व्हायचं सांगण्यात आलं, असंही पाटलांनी आवर्जून सांगितलं.
मागील पाच वर्षात मी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावा केला नाही. या काळात कॅबिनेट खेळीमेळीत झाल्या. त्यामुळे असा कोणता दावा करण्याचा विषयचं येत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
माणसाला कोणतीही गोष्ट अचानाक मिळते. अचानक मिळालेली गोष्ट सर्वोत्तम मानून घ्यायची असते, असा सूचक इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं तसंच मुख्यमंत्रीपदही मिळेल का? अशा चर्चा आता तोंड फुटू लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-