मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. 20 ऑगस्टपासून मराठा बांधवांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करण्यात आली.
9 ऑगस्टला जे आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडला होता. त्यामुळे यापुढचे आंदोलन रस्त्यावर होणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती.
मराठा बांधवांनी आता आरक्षण आणि इतर सर्व प्रमुख मागण्यांसाठी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण केव्हा देणार हे लेखी द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे. या मागणीसाठी 20 ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे.
पुणे विभागीय कार्यालयासमोर मराठा बांधव हे साखळी उपोषण करणार आहेत.