“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

औरंगाबाद | आपल्या देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक आंदोलन झाली आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाचा थेट फटका राजकीय सत्तकेंद्रानां होते हे देशानं अनेकदा पाहिलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यानं आणि सबंध देशानं ऐतिहासिक आरक्षण आंदोलनं पाहिली आहेत. महाराष्ट्रातील मराठा आंदोलन असेल, गुजरातमधील पटेल आंदोलन असेल या आंदोलनांनी आंदोलनाचं ऐतिहासिक स्वरूप देशाला दाखवलं आहे.

महाराष्ट्रातील बहूसंख्यांक समाज म्हणून मराठा समाजाला ओळखलं जातं. या समाजाच्या मागण्यांसाठी सर्व समाजांनी पाठिंबा देखील दिलं आहे.

आता आगामी काळात राज्यात बहुतांश महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परत एकदा आरक्षणाचा मुद्दा जोर पकडण्याची शक्यता आहे.

मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा सुद्धा अनेकदा राज्यात चर्चीला गेला आहे. अनेकदा मुस्लीम आरक्षणाबाबत राज्यात मोर्चे निघाले आहते. आता परत एकदा याची चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून औरंगाबादला ओळखण्यात येते या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमीत्तानं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारवर मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

मुस्लिमांना आरक्षण न देणं हा अन्याय आहे. समाजातील दुर्बल घटकांना आरक्षणाची खरी गरज आहे. परिणामी या सरकारनं आरक्षणावर योग्य कारवाई करणं अपेक्षित आहे, असं ओवेसी म्हणाले आहेत.

आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आता आम्हीही उतरावं का?, असा सवाल ओवेसी यांनी सरकारला विचारला आहे. उच्च न्यायालयानं मुस्लिमांना आरक्षण देण्याबाबत मत व्यक्त केल्याचं सुद्धा ओवेसी म्हणाले आहेत.

तुम्ही मराठा आरक्षणावर बोलता मग तुम्हाला मुस्लीम आरक्षणावर बोलण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते का?, असा सवाल सरकारला ओवेसी यांनी विचारला आहे.

दरम्यान, ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणावर आपली मतं व्यक्त केली आहेत. याचाच अर्थ येणाऱ्या निवडणुकीत औरंगाबादमध्ये मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं दिसून येतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं” 

  लस न घेणारे इंदुरीकरच आता सांगणार लस घ्या