मराठ्यांकडून दंड वसुल करा; वाचा कुणी केली आहे ही खळबळजनक मागणी

मराठा मोर्चांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

द्वारकानाथ पाटील यांनी ही खळबळजनक मागणी केली आहे. ते शेतकरी असल्याचं कळतंय. अॅड. आशिष गिरी यांनी द्वारकानाथ यांचं वकिलपत्र घेतलं आहे.

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चांवर बंदी घालावी आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या आंदोलकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

हिंसक आंदोलन करणारे नेमके कोण याचा शोध घ्यावा, सर्व मराठा आंदोलकांना कलम 149 अंतर्गत नोटिसा बजावण्यात याव्यात, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 13 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.