Maratha Reservation l मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात आले आहेत.
या मंत्र्यांच्या हस्ते राजपयत सुपूर्द :
लाखो मराठा आंदोलकांना अखेर यश मिळालं आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आले. यानंतर मनोज जरांगे यांनी मध्यरात्री पत्रकारांशी संवाद साधला.
Maratha Reservation l पत्रकारांशी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले :
आपल्या लढयानुसार 57 लाख नोंदी सापडल्या. त्यांना लवकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 57 लाख प्रमाणपत्रांपैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटले असून, त्याचा डाटा लवकरच आपल्याला मिळणार आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे.
याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. सरकराने दिलेल्या राजपत्रावर आपल्या वरिष्ठ वकिल यांची तीन तास चर्चा झाली. हायकोर्टाच्या वकीलांनी याची पु्र्ण तपासणी केली आहे.
आपली लढाई यासाठी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. सोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार असल्याचे सांगतले आहे.
Maratha Reservation l दरम्यान, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहे.
News Title : Maratha Reservation Got
महत्त्वाच्या बातम्या-
Sania Mirza Instagram Post l सानिया मिर्झाची इंस्टग्राम पोस्ट होतेय ट्रोल! पाहा नक्की काय आहे
Fighter Online Leaked l या वेबसाईटवर फायटर चित्रपट ऑनलाईन लीक! निर्मात्यांना मोठा धक्का
Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील
Pune Tourist Places l या प्रजासत्ताक दिनी पुण्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या