औरंगाबाद | मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रिम कोर्टात असताना मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, उद्या दि. 23 जुलै रोजी कायगाव टोका येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात अनेक तरुणांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत दिली नाही. मृत युवकांच्या कुटुंबांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत आहे. सरकारला 10 दिवस आधी आंदोलनाचा इशारा देऊनही सरकारकडून कोणतीही पावलं उचलण्यात आली नसल्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचं रमेश केरे यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद मधील कायगाव टोका येथे उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणासाठी याच ठिकाणी जलसमाधी घेतली होती. औरंगाबाद पोलिसांनी कायगाव टोका येथे आजपासूनच फौजफाटा तैनात केला आहे.
पोलिसांनी कितीही पावलं उचलली तरी आंदोलनाच्या निर्णयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा ठाम राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुणेकरांनो सावध व्हा, पुण्याने गाठलेला हा आकडा आहे धक्कादायक!
नालायक पाकिस्तान!; भारत-चीन वादाचा फायदा घेत अशाप्रकारे करतोय कुरापती!
अण्णा हजारे पुन्हा उतरले मैदानात; महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा
संतापजनक! 11 महिने अल्पवयीन मुलीसोबत जे केलं ते ऐकून काळजाचा थरकाप होईल!
क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!