…म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

मुंबई :  मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकराच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं दिसतंय. म्हणूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्री मराठा समाजाचाच व्हावा, अशी ठाम भूमिका आता मराठा समाजाने घेतली आहे. त्यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरीही मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत, असा आरोप मराठा सामाजाच्यावतीने केला जात आहे.

गेल्या 35 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाची गाजरं दाखवून राजकीय फायद्यासाठी सर्व पक्षाने वापर केला आहे. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधीं समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळए ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहेत, अशी माहिती मराठा मोर्चाकडून देण्यात आली आहे.

कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी, लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आलं आहे.

ठोक मोर्चाचे आण्णासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी ठोक मोर्चाची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“ट्रम्प खोटं बोलले; काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितलीच नाही”

-आधी कमलनाथांनी आणि आता रेड्डींनी फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न’!; स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या

-‘ती’ म्हणते; आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग सुटेल… असं आम्हाला वाटलं नव्हतं!

-हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रिषभ पंत म्हणतो…

-मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी बसवला पुतळा!