अभिनेत्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीला अटक

पुणे | चित्रपट अभिनेत्याने विनयभंग केल्याचा आरोप करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार पुणे शहरात घडला. अभिनेता सुभाष यादव याच्या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी अभिनेत्री सारा श्रवण उर्फ सारा गणेश सोनावणे हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई येथून अटक केली.

खंडणीच्या गुन्हात सारा हिचा अटकपूर्व जामिन सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे पुणे पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली. सारा हिची रविवारी काही अटी घालून कोर्टाने जामिनावर सुटका केली.

चित्रपट अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सहकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हात सारा श्रवण दुबईमध्ये पळूण गेली होती, तिच्याविरुध्द लुक आउट  नोटीस काढण्यात आली होती.

याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यादव आणि रोहिणी माने यांनी ‘रोल नंबर अठरा’ या चित्रपटात काम केले होते. रोहिणी माने आणि सारा श्रवण या मैत्रिणी होत्या. चित्रपट प्रदर्शनानंतर सुभाष यादव यांना प्रसिध्दी  मिळत  होती ती माने आणि सारा यांना पाहवत नव्हती. तसेच माने  ही माझ्याशी लग्न कर म्हणून मागे लागली होती. याबद्ल यादव यांनी नकार दर्शवला असता माने यांनी यादव यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

महत्वाच्या बातम्या –