धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या पतीने गळफास घेत केली आत्महत्या!

नांदेड | 2020 हे साल सर्वांसाठी खूपच खराब ठरलं आहे. कोरोनासारख्या विषाणूने महामारी झाली आहे. त्यात इंडस्ट्रीतील कलाकारांचे निधन, त्यानंतर कलाकारांची आत्महत्या. अशातच मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे.

आशुतोष भाकरे असं त्याचं नाव असून त्याने नांदेडमध्ये आपल्या राहत्या घरी गफास घेत आत्महत्या केली आहे. आशुतोषसुद्धा एक उदयोन्मुख अभिनेता होता. त्याने इतका टोकाचा निर्णय कोणत्या कारणामुळे उचलला याबद्दल अजून काही माहिती समजू शकलेली नाही. . या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस अशा काही चित्रपटात ती झळकली आहे.

दरम्यान, अभिषेकने काही दिवसांपुर्वी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये  एक व्यक्ती, आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतो?, यासंदर्भात काही मााहिती सांगताना दिसत होती. मात्र आशुतोष असा निर्णय असं कोणालाच वाटलं नव्हतं.

 

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं’; रोहित पवारांचा पाटलांना टोला

कौतुकास्पद! सोनूने भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला दिली नोकरी

“भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं 10 गोष्टी केल्या तर चीन 1 हजार गोष्टी करेल, राफेल ‘गेमचेंजर’ ठरणार नाही”

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरे गरजले