ठाकरे सरकारची ‘मराठी ललकार’… सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

मुंबई | ठाकरे सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इथून पुढे आता सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे.

2020-21 या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, 2021-22 या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, 2022-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर 2023-24 या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-पृथ्वीबाबांचा मोदी अन् ठाकरे सरकारला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

-पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…

-बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

-…म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजांचा परळी दौरा रद्द

-क्रिकेटपटू शमीच्या पत्नीनं शेअर केला न्यूडफोटो, सोबत असलेल्या व्यक्तीवरुन तर्कवितर्क