महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेने पडणारा नेता नेला- नवाब मलिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

स्वत: निवडणून येण्याचा विश्वास आणि ताकद नाही म्हणून सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण शिवसेनेने पडणारा नेता नेला, अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांनी दिली आहे. 

शिवसेनेच्या तीन जागा आम्ही कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ, असा दांडगा विश्वास नवाब मलिकांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि विश्वासघात झाला तर वाईट नक्कीच वाटण्याची गोष्ट आहे. सचिन अहिरांनी पक्ष सोडला त्याचं पक्षाला आणि पक्षातील नेत्यांना दु:ख झालं आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 

सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरीही त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षाने सचिन अहिरांना 15 वर्षे मंत्रीपद आणि 15 वर्षे मुंबईचं अध्यक्षपद दिलं होतं. मात्र मुंबईत विधानसभेत निवडणुकीत यश मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असा आरोप मलिकांनी केला आहे. 

दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मोठा फटका बसला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला धक्का; हा आमदार भाजपच्या गळाला??

-भाजप प्रवेशाला नाही म्हटले म्हणूनच मुश्रीफांच्या घरावर धाड??

-“मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत”

-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”

-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

IMPIMP