मराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई| महाराष्ट्रात कोरोनाचा फास दिवसेंदिवस अधिकाधिक आवळत चालला आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच करोनामुळे निधन झालं आहे.

जगदीश लाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र कोरोनावर ते मात करू शकले नाहीत. जगदीश हे केवळ 34 वर्षांचे होते. बडोद्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीश लाड याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

जगदीशच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे त्याने मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेत दोनवेळा सुवर्णपदकं पटकावली होती. इतकंच नाही तर मुंबईतील वर्ल्ड चॅम्पियन्सशिपमध्ये त्याला कांस्य पदक मिळालं होतं.

मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.

महत्वाच्या बातम्या – 

धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे…

‘दोस्ताना 2’ नंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन…

‘मला आणि माझ्या कुटूंबाला भाजपकडून जीवे मारण्याच्या…

IPl 2021: पृथ्वी शाॅच्या झंझावती खेळीमुळे दिल्लीचा कोलकातावर…

इरफान खानला झाला होता मृत्यूचा आभास; शेवटचा श्वास घेत…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy