Top news

2 वर्षाच्या चिमुरड्यासह विवाहित प्रेयसी पोहोचली थेट प्रियकराच्या दारात, अन्…..

जौनपूर| महाराजगंज परिसरात केवटली गावामध्ये एक अजबच घटना घडली आहे. एक प्रेयसी 20 महिन्याच्या मुलासह आपल्या प्रियकराच्या घराबाहेर ठाण मांडून बसली. अखेर 4 दिवसांनी प्रियकराने तिचा स्विकार केला.

केवटली गावात ही घटना घडली असून प्रियकराने स्विकार केल्यानंतर कुटुंबाने तिला घरात प्रवेश देण्यास मनाई केली. त्यामुळे सध्या ते दोघं घरापासून लांब एका झाडाखाली बसून राहिले आहेत. परंतु बदलापूरचे सीओ चोप सिंह यांच्या मध्यस्थीने या दोघांना एकत्र राहण्यासाठी परवानगी.

प्रियकर आणि प्रेयसीने पोलिसांच्या उपस्थितीत एकमेकांच मत मांडले. प्रियकराने तिचा स्विकार केल्यानंतर दोघांनही घरात जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांना घरात येण्यास आडवलं.

पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तरीही घरातील लोकांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यामुळे तुमची व्यवस्था तुम्हीच करा, असं पोलिसांनी सांगितलं. तर सध्या हे दोघं घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका झाडाखाली वास्तव्य करत आहेत.

प्रियकर कमरुल याचं म्हणणं आहे की, वडिलांनी घरातील एक रूम तिला देण्यास सांगितली होती. परंतू आता वडिलांचा फोन बंद येतोय. त्यामुळे मी 3 दिवस प्रतीक्षा करण्याचं ठरवलं.

पोलिसांनी 4 दिवस प्रेयसीच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त तिच्या मोठ्या सासूकडे केला होता. बदलापूरचे सीओ चोप सिंह स्वत: घटनास्थळी पोहोचले. तिच्या प्रियकराला त्याठिकाणी बोलावून दोघांमधील वाद मिटवला.

विवाहित महिलेने 20 महिन्याचा बाळ प्रियकराचं असल्याचा दावा केला आहे. तसेच प्रियकराने तिला 28 एप्रिलला वाराणसीला बोलावलं, तेव्हा तीन दिवस प्रियकराच्या बहिणीसोबत ती तिथे राहिली.

दरम्यान, दुसरीकडे पत्नीला शोधण्यासाठी तिचा पती पोलीस स्टेशनला चकरा मारत होता. पण पत्नी प्रेयसीच्या घराबाहेरच ठाण मांडून बसली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ विवाहित दिग्दर्शकाला हृदय देऊन बसली होती…

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ