आरामदायी Marutiची नवी 7 सीटर कार लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

नवी दिल्ली |  मारूती सुझूकीची अर्टीगा 2022 अनेक अपडेट्सह लाँच करण्यात आली आहे. या MPV ची सुरुवातीची किंमत  8.35 लाख ठेवण्यात आली आहे. तसेच ZXi+ च्या टॉप मॉडेलची किंमत 12.79 लाख (एक्स-शोरूम) असणार आहे.

प्रथमच मारूती अर्टीगाच्या टॉप मॉडेलमध्ये सीएनजीचा पर्याय दिला जाणार आहे. अर्टीगाचा नवा अपडेटेड लुक आणि फिचर्स देखील अपडेट करण्यात आले आहेत.

Ertiga भारतात पहिल्यांदा 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. देशातील टॉप टेनमध्ये विकल्या जाणाऱ्या कारमध्ये अनेकवेळा या कारचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने सात लाखांपेक्षा जास्त युनिटची विक्री केली आहे.

या MPV साठी प्री-बुकिंग एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला 11 हजार रूपयांपासून सुरू झालेली आहे. MPV ला LXI, VXI, ZXI आणि ZXI+ या चार प्रकारात आणण्यात आले आहे.

मारूती सुझुकी अर्टीगामध्ये जबरदस्त सिरीज 1.5 लिटर VVT इंजिन देण्यात आले. पेट्रोल इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल युनिट आणि नवीन 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटशी जोडलेले आहेत.

अॅटोमॅटीक गिअर बॉक्समध्ये पॅडल शिफ्टर्स उपलब्ध आहेत. 2022 मारूती सुझुकी अर्टीगामध्ये नवीन ग्रिल, 7-इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इंजिनचे स्टार्ट स्टॉप बटण हे फिचर्स मिळतात.

दरम्यान, सदर कार एकूण सहा रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. स्प्लेंडिड सिल्व्हर, मॅग्मा ग्रे, पर्ल मेटॅलिक आर्क्टिक व्हाइट, प्राइम ऑक्सफर्ड ब्लू आणि ऑबर्न रेड या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

महत्तावाच्या बातम्या- 

रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…

राज ठाकरेंच्या भाषणानंतर शरद पवारांना सतावते ‘ही’ चिंता, म्हणाले…

गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंना सुनावलं, म्हणाले “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”

“एकेकाळी माझे पाय धरायचे, ते आता माझ्याविरोधात आणि पवारांवर बोलतात

‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी