Maruti Suzuki XL6 Facelift: हायटेक फिचर्ससह भारतीयांची आवडती कार लाँच; किंमत पण फारच कमी

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून प्रख्यात कार निर्माण कंपनी मारूती सुझूकी वेगवेगळे मॉडेल्स आपल्या ग्राहकांसाठी लाँच करत आहे. मारूती सुझुकीने गुरूवारी लोकप्रिय कार MPV XL6 2022 लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 11.29 लाख रूपये असणार आहे.

जुन्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीने अनेक नव्या बदलांसह कार लाँच केली आहे. कारच्या आतमध्ये आणि बाहेरील स्वरूपात खास बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक ग्राहक ही गाडी खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.

मारूती सुझुकी कंपनीने 2022 XL6 मध्ये अनेक नविन फिचर्स दिले आहेत. ही फॅमिली कार चांगला पर्याय म्हणून ग्राहकांसमोर असणार आहे. या 6 सीटर MPV च्या टॉप मॉडेलची किंमत 14.55 लाख रूपये असणार आहे.

कंपनीने अनेक बदलांसह नवीन इंजिन दिले आहे. 6 स्पीड ऑटोमॅटीक टॉक कन्व्हर्टर गियरबॉक्स आणि पॅडल शिफ्टर्ससह असणार नाही. यामध्ये पुर्वीप्रमाणेच 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

किया कारेंसच्या तुलनेत मारूती सुझुकीने XL6 मध्ये अनेक हायटेक फिचर्स दिले आहेत. यात 360 डिग्री कॅमेरा, सुझुकी कनेक्ट अॅपच्या माध्यमाने अनेक कनेक्टेड कार फिचर्स आहेत. मध्यल्या रांगेत कॅप्टन सीट देखील देण्यात आली आहे.

दरम्यान,  नवीन MPV सहा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. स्प्लेंडिड सिल्व्हर, आर्क्टिक व्हाइट, ब्रेव्ह खाकी, ऑप्युलेंड रेड आणि सेलेस्टियल ब्लू या रंगांमधून ग्राहक आपली पसंती निवडू शकतात. अनेक कार कंपन्यांना ही कार टक्कर देऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- 
CSK vs MI: मुंबईसोबतच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका!

सिंगल लोकांनो नक्की वाचा! विवाहित पुरूषांबाबत कंगणा राणावत म्हणाली…

चिंताजनक! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; संशोधनातून ‘ही’ 4 भलतीच लक्षणं समोर

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अखेर इंदौरमधून अटक

“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”