हस्तमैथुन करणं ठरू शकतं धोकादायक; 20 वर्षाच्या मुलासोबत जे काही झालं ते…

नवी दिल्ली | हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट?, असा सवाल सर्वांना किशोर वयापासून पडत असतो. हस्तमैथुनबद्दल उघडपणे बोललं जात नसल्याने अनेकदा अफवा आणि चुकीची माहिती पसरवली जाते.

व्यक्ती आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून शारिरसुखाचा आनंद घेत असते. शरिरसुखाचा विचार करून उत्तेजित होत असते. वीर्यस्खलन झालेला हा सुखावणारा अनुभव असल्याने काहीजण सात्त्याने उत्तेजित होण्याचा प्रयत्न करतात.

अशातच स्वित्झर्लंडमध्ये 20 वर्षीय तरुणाला हस्तमैथुन करणं महागात पडलं आहे. अंथरुणावर हस्तमैथुन करत असताना मुलाला अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तपासणी केली असता रुग्णाचा चेहरा सुजल्याचे डॉक्टरांना आढळून आले. तो श्वास घेत असताना आणि बाहेर टाकताना वेगवेगळे कर्कश आवाज ऐकू येत होते. त्याच्या केस हिस्ट्रीवरून असे दिसून येते की तो देखील सौम्य दम्याचा रुग्ण आहे.

रुग्णाच्या छातीच्या एक्स-रेमध्ये न्यूमोमेडियास्टिनम नावाची दुर्मिळ स्थिती दिसून आली. त्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज होती. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्याची वेळ आली.

दरम्यान, काही दिवस आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यूमोमेडियास्टिनम नावाची दुर्मिळ ही दुखापत हस्तमैथुनामुळे झाली होती, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2022: DK पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार?; विराट कोहली म्हणाला…

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता!

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनो… उद्यापासून मार्केटमध्ये ‘हा’ मोठा बदल होणार!

“दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव”, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

“मला पुण्यातून बाहेर पडायचंय, पुण्यावर भयंकर संकट कोसळलंय”, मुक्ता बर्वेची पोस्ट