देश

अब्जपती असलेल्या फुटबॉलपटूची ही पोस्ट वाचून तुम्ही नक्कीच शेअर कराल

युरोप कप फुटबॉलच्या एका उपांत्य सामन्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी पावाचा तुकडा मैदानावर त्या खेळाडूच्या दिशेने भिरकावला। खरं तर त्याने त्याकडे दुर्लक्ष करायला हवं होतं किंवा तो तुकडा उचलून सीमारेषेवर भिरकावून द्यायला हवा होता। कारण वार्षिक तीन चारशे कोटी कमाई करणारा तो अब्जाधीश फुटबॉलपटू होता। तोपर्यंत तो दोन विश्व चषक खेळला होता अन एक विश्व चषक जिंकण्यात सहभागी झाला होता। त्याने उद्धटपणे काहीही केलं असतं तरी ते त्याला शोभून दिसलं असतं।

परंतु त्याने तसं काही केलं नाही। त्याने असं काही केलं ज्यामुळे जगातील करोडो फुटबॉल शौकिनांच्या हृदयालाच त्याने हात घातला। त्याची ती एक छोटीशी अनपेक्षित कृती पण करोडो लोकांना एक चांगला संदेश देऊन गेली। असं काय केलं त्याने ?

त्या अब्जाधीश खेळाडूने तो पावाचा तुकडा विनम्रतेने खाली वाकून उचलला। दोन्ही हाताने हळुवारपणे धरून त्याने त्या तुकड्याचं चुंबन घेतलं अन आपल्या कपाळाला लावून त्याने पावाच्या त्या तुकड्याचे कृतज्ञपणे जणू आभार मानले अन तो तुकडा त्याने विनम्रपणे बाजूला नेऊन ठेवला। “अन्न म्हणजे परब्रह्म” हा संदेशच जणू त्या खेळाडूने जगातील करोडो फुटबॉल शौकिनाना दिला। प्रत्येक धर्म हेच सांगत आलाय पण आपण कधी ते मनावर घेत नाही।

Image result for mesut ozil bread

आपण हॉटेलमध्ये कुटुंबासह जातो अन नको इतके पदार्थ मागवतो। पोट भरलं कि उरलेलं टाकून देतो। याला पैशाची मस्ती म्हणतात। पैसे मोजले म्हणून काही त्या अन्नाशी कसंही वागायचा तुम्हाला हक्क मिळत नाही। अनेक देशात असं अन्न टाकलं तर दंड ठोठावतात।

हजार दोन हजार रुपये फेकण्यापूर्वी त्या अन्नासाठी कोणीतरी उन्हातान्हात किती राब राब राबलाय हे कधी विसरू नका आणि अन्नाची नासाडी करू नका असा जणू संदेशच देऊन माणुसकीचं दर्शन उभ्या जगाला घडविणाऱ्या त्या महान फुटबॉलपटूला विनम्र अभिवादन..!

त्या महान फुटबॉलपटूचे नाव आहे, मॅसुट ऑझील

वाचून झाल्यावर न विसरता शेअर करा…

IMPIMP