ऐकावं ते नवलच! मौसम देवी या महिलेनं दिला चार बाळांना जन्म

लखनौ | आपल्यातील अनेकांनी सामान्यतः महिलेनं दोन बाळांना जन्म दिल्याचं ऐकलं असेल. फार तर तीन बाळांना जन्म दिल्याचं ऐकलं असेल. मात्र, उत्तर प्रदेश मधील सीतापूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेनं चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.

रेउसा ब्लॉक येथील भदमारा गावातील मौसम देवी या महिलेनं चार बाळांना जन्म दिला आहे. या महिलेची प्रसूती तिच्या गावीच करण्यात आली होती. प्रसूतीनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

चारही बाळांचे वजन साधारणपणे एक किलो किंवा त्याच्या आसपास आहे. सध्या बाळं आणि बाळंतीण यांची प्रकृती ठीक आहे. मात्र, पुढे जाऊन आरोग्याची काही समस्या उद्भवू नयेत म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मौसम देवी यांनी तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला आहे. भदमारा गावातील या बाळांना पाहण्यासाठी गावातील लोक रुग्णालयात गर्दी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता आणि रियानंतर सुशांतच्या तिसऱ्या एक्स गर्लफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा

चेहऱ्यावरील डाग घालवण्यापासून ते केस गळती थांबवण्यापर्यंत अनेक समस्यांसाठी काकडी असते गुणकारी; सविस्तर वाचा

पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं

कोण आहे राधिका मेहता?; सुशांत मृत्युप्रकरणी ईडीचा धक्कादायक खुलासा!

घृणास्पद! आईनेच पोटच्या लेकीला दाखवला पॉर्न व्हिडीओ अन् मग…