मॅक्सवेल IPLचे ‘हे’ सामने खेळणार नाही; कारण वाचून तुम्हालाही होईल आनंद

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची ओळख निर्माण झाली आहे. जगभरातील क्रिकेट खेळाडू आपल्या अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आयपीएलमध्ये करत असतात.

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. परिणामी बीसीसीआयच्या अधिपत्याखाली आयपीएलचं आयोजन होत असल्यानं अवघ्या जगाचं लक्ष क्रिकेटच्या या रोमांचक स्पर्धेकडं लागलं असतं.

आयपीएल 2022 च्या हंगामाला मार्चमध्ये सुरूवात होणार आहे. परिणामी आत्ताच पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनुसार खेळाडू आपापल्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची आयपीएलमधील कामगिरी म्हणावी अशी खास राहिली नाही. अशातच या हंगामापासून विराट कोहली बंगळुरू संघाचं नेतृत्व देखील करणार नाही.

विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल हा कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढं आहे. अशातच आता मॅक्सवेल आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही.

मॅक्सवेल भारतीय तरूणीशी लग्न करणार आहे. मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार आहे. भारतीय वंशाची विनी रमन या तरूणीशी मॅक्सवेल लग्न करणार असल्यानं तो आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाही.

आयपीएलसोबतच मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावर देखील उपस्थित राहणार नसल्याचा अंदाज आहे. मॅक्सवेल आणि विनी रमन यांचं लग्न 27 मार्चला पार पडणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलनं गत हंगामात आरसीबीकडून खेळताना तुफान फलंदाजी केली होती. जगातील धोकादायक अष्टपैलू फलंदाज म्हणून ग्लेन मॅक्सवेलला ओळखण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!

“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”

‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले