मुंबई | राज्याची सत्ता भाजपच्या हातातून निसटली आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. या सत्ता बदलानंतर भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजन जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जे जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले त्यांचा ठाकरे सरकार आढावा घेण्याची शक्यता आहे. हे सर्व चार प्रकल्प जळगाव जिल्ह्यातले आहेत. त्यासाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावांना अर्थमंत्रालयाची परवानगीच नव्हती, अशी माहिती आहे.
सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय.
दरम्यान, सिंचन प्रकल्पांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारने हवी ती चौकशी करावी, मात्र कामं थांबवू नयेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयनराजेंचा पराभव झाल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आणि नाराजी- संभाजीराजे भोसले https://t.co/q613iUiE1T @Chh_Udayanraje @YuvrajSambhaji @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
‘या’ कार्यक्रमातून गायत्री दातार येतेय प्रेक्षकांच्या भेटीला https://t.co/xeQs2GJXBZ @gayatri_datar @Zee_Yuva
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
पंजाब महाराष्ट्र बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव आलाय- जयंत पाटील https://t.co/cM0Hsb1DtM @Jayant_R_Patil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019