‘हे’ महत्त्वाचं खातं स्वत:कडे असायला हवं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा

मुंबई | प्रत्येक मुख्यमंत्र्याला काही महत्त्वाची खाती स्वत:कडे हवी असतात किंबहुना त्यांना ती ठेवावीशी वाटतात. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील गृहखातं स्वत:कडे ठेवायची असल्याची माहिती कळतीये.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता समीकरणं बदलली आहेत. बदललेल्या नव्या समीकरणानुसार मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 16 तर काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार आहेत.

दुसरीकडे 28 डिसेंबरला उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आठवडा उलटून गेला तरी ते आणखी बिनखात्याचे मंत्री आहेत. खातेवाटप अजूनही झालेलं नाहीये. तर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला नाहीये.

दरम्यान, गृहखातं हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याची माहिती आहे. आता राष्ट्रवादी गृहमंत्रिपदावरचा दावा सोडते का? आणि गृहमंत्रिपद शिवसेनेला देऊ करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-