आणखी एका तरूणीला शरद पवारांनी दिला आशीर्वाद!

जळगाव | विधानसभा निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक संधी देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं आहे. त्यामुळे तरुण उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जळगाव ग्रामीणमधून कल्पिता पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

कल्पिता पाटील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत तसेच त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली, शरद पवारांनीही त्यांना आशीर्वाद दिला आहे.

जळगाव ग्रामीणमधून सध्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील आमदार आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचं आव्हान होतं, मात्र घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे त्यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे.

देवकरांचं नाव मागं पडण्याच्या शक्यतेनं राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यात आता कल्पिता पाटील यांनी उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी भेट घेतली. पक्षाकडून त्यांना काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचं कळतंय.

दरम्यान, राष्ट्रवादीत पडझड सुरू असताना शरद पवारांनी तरूणांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्धार केलाय. त्याचाच प्रत्यय जळगावमध्येही येताना दिसत आहे.

कल्पिता पाटील यांची फेसबुक पोस्ट-

महत्त्वाच्या बातम्या-