लखनऊ | हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्याच्या घटनेचे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी स्वागत केलं आहे.
हैदराबाद पोलिसांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं, असं मायावतींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशातही महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पण राज्य सरकार झोपलं आहे. इथल्या आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनकडून प्रेरणा घेतली पाहिजे, अशा शब्दात मायावतींनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, दुर्देवं आहे की उत्तर प्रदेशातील आरोपींना राज्याचे पाहुणे असल्यासारखी वागणूक दिली जाते. उत्तर प्रदेशात सध्या जंगल राज सुरु आहे, अशा शब्दांत मायावतींनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादमध्ये झालेला एन्काउंटर कायद्याला धरून नाही- उज्ज्वल निकम https://t.co/BHVeSOP9Z4 #Ujawal_nikam
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं एक आई म्हणून मी समर्थन करते- चित्रा वाघ https://t.co/6tn5ENREn7 @ChitraKWagh
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट! https://t.co/UC1NBan6JH @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019