देश

भावाविरोधात कारवाई केल्याने मायावती भडकल्या; म्हणतात…

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या भावाविरोधात आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर मायावती भाजपवर चागंल्याच भडकल्या आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईविरोधात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

गरिबांची मतं विकत घेऊन भाजप सत्तेत आलं आहे. जर त्यांना वाटत असेल की ते खूप प्रामाणिक आहेत तर त्यांनी पक्षातील सगळ्यांची राजकारणात येण्यापूर्वी किती संपत्ती होती आणि आता किती आहे ही चौकशी करावी, असं म्हणत मायावतींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप आणि आरएसएसमध्ये जातीवादी आहेत. शिक्षण, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात दलित आणि इतर मागासवर्गीयांचा विकास होऊ नये यासाठी भाजप विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचा आरोपही मायावतींनी भाजपवर केला आहे.

मायवती यांचा भाऊ आणि बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांंच्या नोएडातली 400 कोटी रूपये किमतीची सात एकर जमीन आयकर विभागाने छापा टाकून जप्त केली आहे.

दरम्यान, 2007 ला मायावतींचं सरकार आल्यानंतर एकामागून एक 49 कंपन्या चालू केल्या आणि 2014 मध्ये 1316 कोटींच्या संपत्तीचे ते मालक झाले.

महत्वाच्या बातम्या-

वंचितची स्वबळावर लढण्याची तयारी; 30 जुलैला जाहीर करणार विधानसभेची पहिली यादी!

-नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी’ला खिंडार?; 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर???

-पराभवानंतर पार्थ मतदारसंघात फिरकलेच नाहीत; अजित पवार म्हणतात…

-आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल आणि झुकलं पाकिस्तान; घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

-113 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश???

IMPIMP