“हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाच्या बाळाचं नाव ‘चिवा’ ठेवू”

मुंबई | शिवसेनेचे युवानेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील राणी बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. त्यानंतर आता या राणी बागेतील प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील थ्रीडी ऑडिटोरियममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छोट्या पेंग्विनचं बारसं घातलं आहे.

मुंबईकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असणारे पेंग्विन हे मात्र पर्यटनासोबतच राज्यातील राजकारणाचा विषय आहे. शिवसेनेची सध्या मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.

पेंग्विनच्या मुद्द्यावरून अनेकदा विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. आताही भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पेंग्विनच्या नाव ठेवण्यावरून नवा वाद उभा केला आहे.

पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून वाघ यांनी टीका केली होती. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही मराठी नावं देखील देऊ शकतो आम्हाला काहीच अडचण नाही. हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव चंपा आणि माकडाच्या बाळाचं नाव चिवा ठेवू, अशी खरमरीत टीका पेडणेकर यांनी केली आहे.

भायखळा येथील जिजामाता भोसले उद्यान व प्राणिसंग्रालयात नव्यानं जन्मलेल्या पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याच्या नावांवरून हा सर्व गोंधळ सुरू झाला आहे.

इतक्या खालच्या स्तरावर येऊन टीका करण्यामागं यांची काय पोटदुखी आहे हे समजत नाही, असंही किशोरी पेडणेकर चित्रा वाघ यांना म्हणाल्या आहेत. परिणामी हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील या पेंग्विनच्या प्रकल्पावरून अनेकदा टिकेला सामोरं जावं लागलं आहे. असं असलं तरी मुंबईकर मात्र पेंग्विनच्या पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतात, “दारू म्हणजे औषध, आयुर्वेदात…”

अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज