केज, बीड: खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका-mcoca) कारवाई करण्यात आली आहे. केज न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कराड समर्थकांनी परळीमध्ये (Parali, Beed) आंदोलन केले. काही ठिकाणी जाळपोळ आणि बसवर दगडफेकही झाली. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा संशय
मस्साजोग (Massajog, Beed) येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती.
१५ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मंगळवारी त्याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईसाठी सीआयडी आणि एसआयटीने अहवाल पाठवला होता.
न्यायालयात काय घडले?
न्यायालयाने वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) पुढील तपासासाठी त्याला ताब्यात देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली.
दरम्यान, आरोपीचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मकोकासंदर्भात कोणतेही कागदपत्रे नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. फिर्यादी पक्षाचे वकील अॅड. जितेंद्र शिंदे यांनी कराडला आणखी १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
परळीत आंदोलन, जाळपोळ आणि दगडफेक
वाल्मिक कराडवर मकोका लावल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी परळीमध्ये आंदोलन केले. दुपारनंतर परळी शहर बंदची हाक देण्यात आली. अनेक ठिकाणी जाळपोळ व बसवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धनंजय मुंडेंची अजित पवारांशी भेट
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परळीतील सद्यस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीनंतर मुंडे परळीला रवाना झाले.
Title: MCOCA Slapped on Walmik Karad, Supporters Protest, Tension in Beed
Keywords: Walmik Karad, MCOCA, Beed, Protest, Violence, वाल्मीक कराड, मकोका, बीड, आंदोलन, हिंसा