औरंगाबाद महाराष्ट्र

#Metoo प्रकरण दडपण्यासाठी शिक्षकानं केलं ‘हे’ कृत्य

जळगाव | जळगावमधील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली कृत्यंं सर्वांसमोर येऊ नये म्हणून शिक्षकाने विद्यार्थीनींचे गुण वाढवून दिले आहेत.

‘मी टू’ प्रकणावर पडद्याआड करण्यासाठी एका शिक्षकाने तीन विद्यार्थीनींचे गुण वाढवले आहेत, अशी तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

काही महिन्यापूर्वी प्राध्यापक सुधीर भटकर यांचे वर्गातील विद्यार्थीनीसोबत प्रेमप्रकरण सुरु झाले. वयाची पन्नाशी गाठलेल्या भटकरांच्या प्रेमप्रकरणाला इतर विद्यार्थी कंटाळले होते. 

काही विद्यार्थ्यांनी भटकर यांच्या दालनात गोंधळही घातला होता. मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी विद्यार्थीनींचे गुण वाढवणे भटकर यांना योग्य वाटलं. पण या सगळ्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. 

चक्रावून टाकणाऱ्या या सर्व घटनेबाबत अखेर एका विद्यार्थ्याने कुलगुरुंकडे लेखी तक्रार केली आणि भटकरांचं बिंग फुटले.

विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सर्व प्रकरणाची समिती नेमली. या समितीने केलेल्या चौकशीवरुन भटकर यांच्यावर कारवाई होणार आहे.