मेधा कुलकर्णींना डच्चू; चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मदतारसंघातून निवडणूक लढणार असल्याच नक्की आहे. पक्षानेच पाटील यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला आहे. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.

चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये उभे राहणआर असल्याची चर्चा होती. भाजपसाठी कोथरूड सुरक्षित असलेला मतदारसंघ आहे. पाटील विधानपरिषदेचे आमदार असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते टोले मारत आहेत. ते लोकांमधून निवडून न आल्याची टीका शरद पवारांनी केली होती.

पुण्यातील कोथरूड पेठ मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक लढण्याचे निश्चित झाले आहे. अशी माहिती समोर येत आहे. 1995 पासून पुण्याचे खासदार गिरीष बापट कसबा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.

कोथरूड मतदारसंघात खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उभे राहणार असल्याने मेधा कुलकर्णी यांची संधी हुकली आहे. तसेच मुरलीधर मोहोळ आणि यांच्यासह इतर इच्छुकांनाही आता आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे अंतिम उमेदवारी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसेंसह चार उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती कळत आहे. 

महत्वाच्या बातम्या-