पुणे महाराष्ट्र

आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट

पुणे |  भाजपची विधानपरिषदेची चार उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आलं आहे. यानंतर त्यांनी नाराज होऊन एक भावनिक ट्विट केलं आहे.

कोथरूडच्या माजी आमदार असलेल्या कुलकर्णी यांना चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोथरूडमधून निवडणूक लढवता आली नव्हती. त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देतो, असं प्रॉमिस केलं होतं. परंतू ते प्रॉमिस चंद्रकांत पाटील तसंच भाजपने पाळलं नाही. त्यानंतर त्यांनी आता व्यक्त व्हायला शेरोशायरीचा आधार घेतला आहे.

आज फिर दिल ने एक तमन्ना की… आज फिर हमने दिल को समझाया अशा शब्दात नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे.

चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं. आधी विधानसभा आता विधानपरिषदेला डावललं, माझं नेमकं काय चुकलं? हे पक्षाने सांगावं. उमेदवारीवर माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. दादांनी प्राॅमिस मोडलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी काल तिकीट नाकारल्यानंतर दिली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘अरे वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

-CBSE बोर्डाच्या 10 वी 12 वीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार- रमेश पोखरियाल

-मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली!