पुणे | भाजपच्या कोथरुडमधील आमदार मेधा कुलकर्णी यांचे महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे बॅनर चक्क रस्त्यावर लावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे एका अॅम्बुलन्सला अडथळा निर्माण झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या सुरु आहे. पुण्यात या यात्रेच्या स्वागतासाठी मोठी फ्लेक्सबाजी करण्याची चढाओढ लागलेली दिसून आली.
मेधा कुलकर्णी यांनीही मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावले. यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले. रस्त्यावरील फ्लेक्स वाहतुकीसाठी अडथळा ठरलाच मात्र अॅम्बुलन्सअडकल्याने हा जनतेच्या जीवाशी खेळ असल्याचं समोर आलं.
या प्रकारामुळे मेधा कुलकर्णी यांच्यावर टीकेची झोड सुरु झालीय. अशा चुका केल्यावर कारवाई करणारे कायदे फक्त सर्वसामान्यांसाठीच का?, असा सवाल सर्व सामान्य जनतेने उपस्थित केला आहे.
ज्यांना जनतेच्या अडचणी समजत नाही त्यांना भाजप पुन्हा तिकीट देणार का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झालाय.
महत्वाच्या बातम्या-
दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील- राजनाथ सिंह- https://t.co/mEhcLIIH6B #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
“दिल्लीमध्ये गडकरी, अमित शहा, सोनिया गांधी आणि पवारांची गुप्त बैठक”- https://t.co/RIey8ICbYj #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
पुण्याच्या प्रवेशद्वारावर पावणे तीन क्विंटलचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत- https://t.co/xfwAVSChm6 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019