“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”

मुंबई | शिवसेना ठाणे जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.

तुम्ही अशाप्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल, तर शिवसेना शाखेला टाळं लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही आणि बातम्यांमधून दाखवलेलं लेटर अजून तरी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

आज शिवसेनेतून अनेक जणांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त आलं, खरं तर सेनेचे हे सगळे लोक आहेत. किती लोकांची तुम्ही हकालपट्टी करणार आहात, परिणामांचा विचार केला असता, तर आम्ही रस्त्यावर उतरलोच नसतो, असं त्या म्हणाल्या.

ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्तीतून कार्यालयातून देण्यात आली आहे. या पत्रावर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची स्वाक्षरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला 

‘तुमचे पुत्र, प्रवक्त्यांनी बाप काढायचा आणि तुम्ही समेटाची हाक द्यायची’, शिंदेंचा घणाघात

रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींची पायउतार, आकाश अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी