महाराष्ट्र मुंबई

“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

मुंबई |  विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पक्षप्रवेशाचा धडाकाच सुरू असल्याचं पहायला मिळतंय. परंतू तरूणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांकडे फडणवीस सरकारचे अजिबात लक्ष नाहीये, असा आरोप करत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब भाजपची मेगा भरती थांबली असेल तर जरा बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा… ती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या भरतीचं तुम्ही काय करणार आहात?? अशी जोरदार टीका मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

डीएड शिक्षक, पोलीस, महसुल, जलसंधारण, या खात्यांमध्ये दिड लाख जागा रिक्त आहेत. त्याकडे लक्ष द्या आणि त्या जागा लवकरात लवकर भरा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तुम्ही जर बेरोजगारीच्या प्रश्नांवर लक्ष दिलं तर किमान तरुणांच्या हाताला काम मिळेल नाहीतर बेरोजगार तरुणांवर आत्महत्याची वेळ येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बेरोजगारीच्या मुद्द्यावर सातत्याने आंदोलन छेडून सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपसाठी मोकळ रान; काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित

-भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटील

-“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

-साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

-राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

IMPIMP