मेहबुबा मुफ्तींचे मोंदीवर गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्या राज्याला…

श्रीनगर | पीडीपी (PDP) आणि भाजपमधील (BJP) संबंध आता ताणले गेले आहेत. काश्मीर हे राज्य नेहमीच भारतासाठी कळीचा मुद्दा राहिले आहे. आता काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नरेंद्र मोदींवर कठोर शब्दात टीका केली आहे.

गेले काही दिवस त्या सतत मोंदींवर आरोप करत आहेत. आता त्यांनी आणखी एक आरोप मोदींवर (Narednra Modi) केला आहे. आमच्या राज्यात लोकशाही संपविली जात आहे, असे मुफ्ती म्हणाल्या आहेत.

तसेच भाजप काश्मीरला प्रयोगशाळा बनवू पाहत आहे, असे मुफ्ती म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणूका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राहणारे काश्मीरी लोक विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नोंदवू शकतात.

राज्यातील सशस्त्र दलाच्या जवानांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतो, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी याला विरोध केला आहे.

यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्यावर अन्याय केला. त्यांनी कलम 370 रद्द केले, असे मुफ्ती म्हणाल्या.

2024 नंतर ते देशाची राज्यघटना (Constitution of India) देखील रद्द करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना भारताला हिंदुत्ववादी आणि भाजपचे हिंदुराष्ट्र करायचे आहे. भाजप सगळ्या राज्यात आमदार फोडून सरकार बनवत आहे, असे मुफ्ती म्हणाल्या.

भाजपला सत्तेची लालसा आहे. सध्या त्यांचा जम्मू काश्मीरमध्ये देखील तसाच प्रयोग सुरु आहे. जम्मू काश्मीर भाजपची प्रयोगशाळा आहे. काश्मीरमधील घटनांची देशभर दखल घेतली जाते, असे मुफ्ती म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! श्रीवर्धन समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ

बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपने दिली मोठी जबाबदारी

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ निर्णय