महाराष्ट्र मुंबई

“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”

मुंबई | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तरूणांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना आदेश दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येणार आहे. यासाठी 15 उमेदवारांची नावे राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने  मी पक्षाला देणार आहे. हे युवक मराठवाडा, विदर्भ तसेच शहरी भागातील असतील, असं मेहबुब शेख म्हणाले. ते महाराष्ट्र केसरीशी बोलत होते.

युवकांच्या हातात राज्य सुरक्षित राहिल. याच दृष्टीने पक्षाने महत्वाची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे, असं शेख म्हणाले.

आम्ही संपूर्ण राज्यात फिरत आहोत. आम्हाला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. येत्या 8 दिवसांत आम्ही यादी तयार करू. निवडून येणाऱ्या आणि ताकदीने काम करणाऱ्या तरूणांना संधी देऊ, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही ज्या तरूणांची नावे पक्षाकडे पाठवू त्यांना पक्ष नक्कीच उमेदवारी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…

स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली

“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”

-राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-लक्ष्मण मानेंचा ‘वंचित’ला दे धक्का; ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ची घोषणा

IMPIMP