Top news

पुरुषांनीही अनुभवल्या मासिक पाळीत स्त्रियांना होणाऱ्या वेदना; अशी होती त्यांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

Photo Credit - Clara Jeffery / Twitter

मुंबई| पहिली मासिक पाळी येणे हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. मासिक पाळीमध्ये स्त्रियांना अनेक वेदनांचा सामना करावा लागतो. या दिवसात अशक्तपणा, मूड स्विंग्स, पोटात दुखणं अश्या प्रकारच्या समस्या होत असतात.

अनेक स्त्रियांना पाळीची सुरुवात होण्याआधी 7 ते 10 दिवस अनेक प्रकारचा त्रास होतो. चिडखोरपणा, थकवा, लघवीला वारंवार लागणे, डोकेदुखी, पोटात कळ,बध्दकोष्ठ, छाती-स्तन दाटून येणे, पायावर सूज यापैकी एक वा अनेक प्रकारचे त्रास होतात.

अनेकदा स्त्रीयांच्या या काळातल्या वेदनांकडे इतरांकडून दुर्लक्ष केलं जातं. अनेक घरांमध्येही महिलेला समजून घेतलं जात नाही. स्त्रिया कमकुवत असतात. असं म्हटलं जातं.

स्त्रिया किती कमजोर असतात, वगैरे अशा आशयाचे टोमणेही मारले जात असल्याचे अनुभवही अनेकींना आले असतील. या पार्श्वभूमीवर, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना किती वेदना होतात, याचा कृत्रिम अनुभव देणाऱ्या यंत्राबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मासिक पाळीत स्त्रियांना किती वेदना होतात, याचा कृत्रिम अनुभव देणाऱ्या यंत्राबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर अमासिक पाळी, वेदनांचा सामना करावा लागतो, पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर, कृत्रिम अनुभव, व्हिडीओ, सं या यंत्राचं नाव असून मित्र-मैत्रिणींनी या यंत्रावर वेदनांचा अनुभव घेतल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे.

या व्हिडीओमधून हे दिसून येतंय की महिलांना या यंत्रांने काहीही होत नाही कारण त्यांना प्रत्येक महिन्याला हा अनुभव येत असतो. तोच दुसरीकडे पुरुषांना मात्र या यंत्राचा त्रास सहन होत नाहीये.

स्त्रियांची मासिक पाळी किती वेदनादायी असते, याबद्दल जागृती करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. काही जणांनी व्हिडीओ फनी असल्याचं म्हटलं आहे, तर काही जणांनी शैक्षणिक उद्देशासाठी या व्हिडिओचा उपयोग करायला हवा, असं म्हटलं आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी घडवली…

दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्ता पार करत असलेल्या हरणावर…

पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध…

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय…

रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल…

IMPIMP